रब्बी ज्वारी
पेरणी पावसाच्या ओलीवर पाच सें.मी. खोलीपर्यंत करावी. एकरी ५९,२०० रोपे ठेवणे जरुरीचे आहे. त्याकरिता पेरणी ४५ x १५ सें.मी. अंतरावर करावी. बागायतीमध्ये पेरणी ४५ x १२ सें.मी. अंतरावर करावी. पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरून एकाचवेळी खत आणि बियाणे पेरावे. प्रति एकरी ४ किलोग्रॅम बियाणे लागते.
रोपावस्थेत खोडमाशी आणि खोडकिडीचा प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास थायमेथोक्झाम (३० एफएस) १० मि.लि. या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. काणी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर ॲसिटोबॅक्टर आणि अॅझोटोबॅक्टर प्रत्येकी २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. खोडमाशीच्या नियंत्रणासाठी, पेरणीनंतर ७-८ दिवसांनी, क्विनॉलफॉस (२५ ईसी) ३०० मि.लि. प्रति २०० लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकरी फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.