पशु संवर्धन | गाई-म्हशींचा गाभणकाळातील नियोजन |

 पशु संवर्धन :-

🐄🐃गाई-म्हशींचा शेवटच्या तीन महिन्यांचा गाभणकाळ हा तसा दूध उत्पादकांकडून दुर्लक्षिला जातो, कारण त्यावेळी दूध मिळत नाही. जनावरांना सुरवातीच्या सहा महिन्यांच्या गाभणकाळात नेहमीचे खाद्य आणि चारा आपण देऊ शकतो. परंतु शेवटच्या तीन महिन्यांमध्ये जनावरांच्या पोटाचा काही भाग वासराने व्यापल्यामुळे तिला पचनाला चांगले खाद्य देण्याची गरज असते, तसेच खाद्य दोनऐवजी चारवेळा विभागून दिल्यास पोटावर अतिरिक्त ताण येत नाही. प्रसूती जवळ आल्यावर पचनाला सोपे खाद्य दिल्यास प्रसूती सुलभ व्हायला मदत होते. शेवटच्या तीन आठवड्यात पचण्यास सोपा जास्त पाचकतत्त्वे असलेला आहार सुमारे ४ ते ५ किलो प्रति दिन विभागून खाऊ घालावा. हिरवा तसेच कोरडा चारा गरजेनुसार द्यावा. शेवटच्या गाभणकाळात व विल्यानंतर सुरवातीच्या काळात भूक कमी असल्याने लवकर पचणारा व भरपूर पोषणमूल्ये असणारा आहार दिल्यास पचनासाठी लागणाऱ्या उर्जेत बचत होते.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post