महाराष्ट्र राज्याचे गहू हे ज्वारीनंतरचे प्रमुख पीक आहे. महाराष्ट्रातील गहू लागवडीखालील क्षेत्र २०१७-१८ मध्ये ९.१९ लाख हेक्टर होते. या क्षेत्रामधून १६.१९ लाख मेट्रिक टन इतके उत्पादन मिळाले. म्हणजेच महाराष्ट्राची सरासरी गहू उत्पादकता १७.६१ क्विंटल प्रति हेक्टर इतकी आहे. महाराष्ट्रातील गहू उत्पादकता देशाच्या तुलनेत निम्म्याइतकी कमी आहे. महाराष्ट्रातील गहू उत्पादकता कमी असण्याची करणे म्हणजे वातावरणात होणारे बादल, सिंचनाच्या मर्यादित सोयी व उपलब्धता, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीचा आभाव ही आहेत. गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी अधिक उत्पादनक्षम शिफारस केलेल्या सुधारित जातींचा वापर, वेळेवर पेरणी, पेरणीची योग्य पद्धत, शिफारशीत खत व पाणी व्यवस्थापन या बाबी महत्वाच्या आहेत.
◆ हवामान : गहू पिकाला थंड, कोरडे, स्वच्छ सूर्यप्रकाशित हवामान चांगले मानवते. बी उगवणीच्या कालावधीत १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान, पिकवाढीच्या अवस्थेत ८ ते १० अंश सेल्सिअस आणि पीक तयार होण्याच्या अवस्थेत २० ते २५ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. सरासरी ७ ते २१ अंश सेल्सिअस तपमानात गहू पीकाची वाढ चांगली होते. थंडीचा कालावधी वाढल्यास उत्पादनात वाढ होते, तर थंडीत खंड पडल्यास उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.