केळीवरील करपा रोगाचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन

 केळी


केळीवरील करपा रोगाचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन 

👉 रोगग्रस्त पानांचा भाग काढून टाकावा. पानांचा ३० टक्के भाग करपल्यास ते पान काढून जाळून नष्ट करावे. 

👉 शिफारस केलेल्या १.५ मी. x १.५ मी. किंवा १.८ मी. x १.८ मी. अंतरावरच लागवड करावी. 

👉 बागेत पाणी साचून राहणार नाही तसेच पाण्याचा योग्य निचरा होईल, याची काळजी घ्यावी. बाग कायम वाफसा स्थितीत ठेवावी. 

👉 ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना बाष्फीभवनाचा वेग, जमिनीचा प्रकार, हंगाम आणि पिकाची वाढीची अवस्था लक्षात घेऊन शिफारशीप्रमाणे बागेला पाणी द्यावे. बागेत अतिरिक्त आर्द्रता निर्माण होऊ देऊ नये. 

👉 बाग आणि बांध नेहमी तणमुक्त आणि स्वच्छ ठेवावेत. 

👉 मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमितपणे कापावीत. 

👉 शिफारस केलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा वेळापत्रकानुसार द्यावी (प्रति झाड नत्र २०० ग्रॅम, स्फूरद ६० ग्रॅम आणि पालाश २००). अतिरिक्त नत्राचा वापर टाळावा. 

👉 बागेत कोणतेही पीक अवशेष ठेऊ नयेत. 

👉 सतत केळी पीक घेणे टाळावे. पिकाची फेरपालट करावी. 

👉 खोडवा घेण्यापूर्वी बागेतील खोडे, पाने काढून बाहेर काढून बाग स्वच्छ करावी. 

👉रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) 

प्राथमिक लक्षणे दिसताच, मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड २.५ ग्रॅम 

प्रादुर्भाव जास्त झाल्यास, कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा प्रॉपीकोनॅझोल १ मि.लि. 

स्टिकरसह पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी शक्यतो सकाळी करावी. पानांचा वरील व खालील पृष्ठभाग द्रावणाने पूर्णपणे भिजेल याची काळजी घ्यावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post