हरभरा पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

 हरभरा

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन 

✨ शेणखत: २ टन/ एकर 

✨ बीजप्रक्रिया: रायझोबियम २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. 

रासायनिक खते: हरभरा पिकास एकरी नत्र १० किलो, स्फुरद २० किलो व पालाश १२ किलो द्यावे. शिफारशीत खतमात्रा पेरणीच्या वेळी एकाच वेळी दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावी. 

जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांचा वापर (प्रतिएकर) 

👉 काळी जमीन किंवा तांबड्या रंगाच्या जमिनी 

युरिया - २२ किलो 

सिंगल सुपर फॉस्फेट - १२५ किलो 

म्युरेट ऑफ पोटॅश - २० किलो 

👉 भरकट चुनखडीयुक्त जमिनी 

१८:४६:०० - ४४ किलो 

म्युरेट ऑफ पोटॅश - २७ किलो 

👉 सर्वसाधारण जमिनी 

२४:२४:० - ८३ किलो 

म्युरेट ऑफ पोटॅश - २७ किलो 

किंवा १५:१५:१५ - ८० किलो 

किंवा १९:१९:१९ - ६३ किलो 

किंवा १०:२६:२६ - ७६ किलो 

किंवा २०:२०:०० - १०० किलो 

म्युरेट ऑफ पोटॅश - २० किलो 

✨ सक्ष्म अन्नद्रव्ये कमतरतेनुसार: जमिनीत जस्त कमतरता असल्यास (०.६ पी.पी.एम.पेक्षा कमी) ८ किलो झिंक सल्फेट आणि लोहाची कमतरता असल्यास १० किलो फेरस सल्फेट पेरणीच्या वेळी बेसल डोसबरोबर द्यावे. 

*हरभऱ्यावर फुले सुरू होताच, मायक्रो न्युट्रिएन्ट ग्रेड-२ १० मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे आठ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी. 

हरभऱ्याला दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी कमी पडल्यास, पिकावर १३:००:४५ १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post