गहू
✨ सुधारित वाण
👉फुले समाधान: बागायती वेळेवर आणि बागायती उशिरा पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, तांबेरा रोगप्रतिकारक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, चपातीसाठी उत्तम, ११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता वेळेवर पेरणी ४५-५०, उशिरा पेरणी ४२-४५ क्विं/हे.
👉 तपोवन: बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे मध्यम परंतु ओंब्यांची संख्या जास्त, प्रथिने १२.५%, तांबेरा रोगप्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, ११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता ४५-५० क्विं/हे.
👉तर्यंबक: बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे टपोरे आणि आकर्षक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगप्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, ११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता ४०-४५ क्विं/हे.
👉 गोदावरी: बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम बक्षी वाण, दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगप्रतिकारक, रवा, शेवया, कुरडई यांसाठी उत्तम, ११०-११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता ४५-५० क्विं/हे.
👉 निफाड-३४: बागायती उशीरा पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे मध्यम आणि आकर्षक, प्रथिने १३%, तांबेरा रोगप्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, १०५-११० दिवसात कापणीस तयार, उत्पादनक्षमता ३५-४० क्विं/हे.
👉 नत्रावती: जिरायती आणि मर्यादित सिंचनाखाली पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे मध्यम व आकर्षक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगप्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, ११०-११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता जिरायती १८-२०, मर्यादित सिंचनाखाली २७-३० क्विं/हे.
👉 पंचवटी: जिरायती पेरणीसाठी उत्तम बन्सी वाण, दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक, प्रथिने १२%, तांबेरा रोगप्रतिकारक, रवा, शेवया, कुरडई यांसाठी उत्तम, १०५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता १२-१५ क्विं/हे
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.