रब्बी ज्वारी आठवडी पिक सल्ला

 रब्बी ज्वारी

पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी विरळणी करुन एका ठिकाणी एकच ठोंब ठेवावा. एकरी ५९,२०० इतकी झाडांची संख्या ठेवावी. पिकाच्या सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसांत तण व पिकामध्ये अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण्यासाठी तीव्र स्पर्धा असते. त्यामुळे सुरुवातीस ३५ ते ४० दिवसांत पीक तणविरहीत ठेवणे महत्वाचे आहे. पहिली कोळपणी पेरणीनंतर तीन आठवडयांनी फटीच्या कोळप्याने करावी. या कोळपणीपुळे तणांचा बंदोबस्त होऊन मातीचा थर जमिनीवर तयार होऊन मातीचा आधार मिळतो. पीक पाच आठवड्यांचे झाल्यानंतर पासेच्या कोळप्याने दुसरी कोळपणी करावी. तिसरी कोळपणी पेरणीनंतर आठ आठवड्यांनी करावी. या कोळपणीमुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन न होता जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार एक ते दोनवेळा निंदणी करावी. पेरणीनंतरच्या ओलावा व्यवस्थानामुळे उत्पादनात २० टक्के इतकी भरीव वाढ होते.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post