कापूस
रोग नियंत्रण
⭕️ दहिया - हवामानातील अधिक सापेक्ष आर्द्रता व कमी होत जाणारे तापमान रोगासाठी कारणीभूत ठरते. प्रामुख्याने जुन्या पानांवर वातावरणातील तापमान कमी झाले, की पांढऱ्या रंगाची बुरशी वाढते. रोगग्रस्त पाने दही शिंपडल्यासारखी दिसतात. या रोगाच्या लक्षणामध्ये सुरवातीला पानांवर अनियमित, टोकदार पांढरट असे १-१० मि.मी. आकाराचे चट्टे पानांच्या शिरांभोवती आढळून येतात. पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा साधारणतः पानांच्या खालच्या बाजूस अधिक प्रादुर्भाव होतो. रोगाचे प्रमाण अधिक असेल तर पाने पिवळी तसेच तपकिरी रंगाची पडून सुकून गळून पडतात.
🛡️ एकात्मिक व्यवस्थापन
👉 सवयंअंकुरित कपाशीची झाडे शेतातून उपटून टाकावीत. प्रादुर्भावग्रस्त पिकाचे अवशेष जाळून नष्ट करावेत.
👉 नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा.
👉 कपाशीचे वाण व जमिनीची परिस्थिती बघून योग्य लागवडीचे अंतर ठेवावे.
👉 सरवातीला रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, कार्बेन्डाझीम (५० डब्लूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
👉 परादुर्भाव जास्त असल्यास, पायरॅक्लोस्ट्रॉबिन (२० डब्लूजी) १ ग्रॅम किंवा मेटीराम (५५%) + पायरॅक्लोस्ट्रॉबिन (५% डब्लूजी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.