तूर
रोग नियंत्रण
⭕️भूरी - पानाच्या पृष्ठ भागावर भुरकट रंगाचे डाग पडतात. हे भुरकट डाग एकत्र येवून संपूर्ण पान पांढरे पडते. पिकाच्या उत्तरावस्थेत रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोगाची तीव्रता जास्त असल्यास, पाने पिवळी पडून आकसलेली दिसतात. तसेच पानगळसुध्दा होऊ शकते.
👉 नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)
कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम
⭕️करपा - प्रादुर्भाव झाडाच्या खालच्या पानावर जास्त प्रमाणात आढळून येतो. पावसाळ्यानंतर फुटलेल्या नवीन पानांवरही या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. सुरुवातीच्या अवस्थेत पाने आणि शेंगांवर छोटे गर्द तपकिरी रंगाचे ठिपके आढळून येतात. ठिपक्यावर तपकिरी रंगाचे चट्टे पडतात. ठिपक्यांचा आकार गोल असून त्यामध्ये अर्धवर्तुळाकार रेषा दिसून येतात. रोगाची तीव्रता जास्त असल्यास झाडाची सर्व पाने गळून पिकाचे जास्त प्रमाणात नुकसान होते.
👉 नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)
कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.