भात पिकातील दाणे रंगहीनता रोग नियंत्रण

 भात

रोग नियंत्रण 

⭕️ दाणे रंगहीनता 

हा रोग अनेक प्रकारच्या बुरशी, तसेच जीवाणूंमुळे होतो. लोंबीतील दाण्यांवर विविध लक्षणे दिसतात. प्रादुर्भावाची तीव्रता बुरशी किंवा जिवाणू यांवर अवलंबून असते. दाणे रंगहिनतेचा थेट परिणाम रंग, वजन आणि आकारमानावर दिसून येतो. रोगामुळे लोंबीतील काही किंवा सर्व पाकळ्या संक्रमित होऊन आतील दाणे रंगहीन होतात. परिणामी दाणे आणि भुसकट यांचे उत्पादन कमी होते. लोंब्या पोकळ होऊन दाणे भरत नाहीत. या व्यतिरिक्त बियाणांची उगवणक्षमता कमी होणे, मुळे व रोपांची वाढ खुंटणे, दाणे सडणे, रोपमर आदी लक्षणेही दिसतात. 

🛡️ एकात्मिक रोग नियंत्रण 

👉 किडींचे तातडीने नियंत्रण करावे. कारण त्यांच्यामार्फत रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. 

किडींचे नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी) - कारटॅप हायड्रोक्लोराईड (५० एसपी) २ ग्रॅम किंवा क्लोरपायरीफॉस (५० इसी) १.५ मि.लि. अधिक स्टिकर १ मि.लि. 

👉 शेत व बांध स्वच्छ व तणविरहित ठेवावेत. 

👉 बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी)- अॅझोक्झीस्ट्रॉबीन (२३ एससी) ०.४ मि.लि. किंवा प्रोपिकोनॅझोल (२५ ईसी) १ मि.लि. किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम (टँक मिक्स) किंवा हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) १ मि.लि. अधिक स्टिकर १ मि.लि. 

पहिली फवारणी लोंबी पोटरीत असताना व दुसरी फवारणी ७५ टक्के लोंब्या बाहेर पडल्यानंतर आणि तिसरी फवारणी आवश्यकता वाटल्यास ७ ते १० दिवसांनी करावी. 

👉 जिवाणूजन्य दाणे रंगहीनता नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी)- कॉपर ऑक्झीक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लीन ०.२ ग्रॅम अधिक स्टिकर १ मि.लि.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post