संत्रा-मोसंबी-लिंबू बागेसाठी पाण्याचे प्रमाण

 संत्रा-मोसंबी-लिंबू

लिंबूवर्गीय फळबागेमध्ये ठिबक सिंचन संच असल्यास त्याच्या नळ्या पसरून घ्याव्यात. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये झाडांना पाणी देण्यासाठी तोट्या (ड्रीपर) किंवा सूक्ष्मनलिका (मायक्रोट्यूब) वापरल्या जातात. या तोट्या दाबनियमक वापरल्यास शेतीमध्ये पाणी सर्वदूर सम प्रमाणात दिले जाते. या पद्धतीमध्ये पाण्याचा दाब आपोआप सर्वदूर ९० ते ९५ टक्के सारखा पसरला जातो. ठिंबक सिंचनाची सुविधा नसल्यास, दुहेरी रींग पद्धतीने सिंचनासाठी आळे करावे. जमिनीची मशागत आणि निंदणी करावी. 

💧संत्रा व मोसंबी बागेसाठी पाण्याचे प्रमाण 

झाडाचे वय    प्रतिझाड प्रतिदिन पाणी 

१ वर्ष  ९ लिटर 

४ वर्षे  ४० लिटर 

८ वर्षे  १०५ लिटर 

१० वर्षे व अधिक     १३१ 

 संत्रा-मोसंबी-लिंबू रोग व किडी नियंत्रण

💧 लिंबू बागेसाठी पाण्याचे प्रमाण 

१ वर्ष  ६ लिटर 

४ वर्षे  १९ लिटर 

८ वर्षे  ५७ लिटर 

१० वर्षे व अधिक     ९२ लिटर


कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post