केळी
केळीची लागवड करताना दोन झाडांमधील आणि दोन ओळींत योग्य अंतर ठेवणे महत्त्वाचे असते. केळीच्या झाडास योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळावा म्हणून दोन ओळींतील अंतर योग्य ठेवावे लागते. सरी पद्धतीत पिकामधील अंतर १.५ मीटर x १.५ मीटर ठेवावे, तर गादीवाफ्यावर लागवडीत १.७५ x १.७५ मीटर अंतर ठेवावे.
केळी लागवडीसाठी कंद अथवा मुनवे निरोगी आणि जातिवंत बागेतून निवडावे. कंद पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव झालेले कंद वापरू नयेत. लागवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या कंदाचा आकार आणि वजन योग्य असणे महत्त्वाचे आहे. मुनव्याचे वय ३ ते ४ महिने असावे व वजन ४५० ते ७५० ग्रॅम असावे. कंद उभट किंवा नारळाच्या आकाराचे असावेत. कंदावर ३ ते ४ रिंगा ठेवून खालील बाजूने वरचेवर कंद तासून घ्यावा. नंतर लागवडीपूर्वी १०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बेन्डेझीम अधिक १५० ग्रॅम अॅसिफेट घेऊन या द्रावणात कंद ३० ते ४० मिनिटे बुडवावेत.
लागवडीसाठी ऊतिसंवर्धित रोपांचाही पर्याय उपलब्ध आहे. लागवडीसाठी जातिवंत, विषाणू निर्देशांक तपासलेली निरोगी रोपे खरेदी करावीत. ऊतिसंवर्धित रोपे एकसारख्या वाढीची, ३० ते ४५ सें.मी. उंच आणि किमान ६ ते ७ पाने असलेली निवडावीत.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.