संत्रा-मोसंबी-लिंबू रोग व किडी नियंत्रण

 संत्रा-मोसंबी-लिंबू

पीक संरक्षण 

👉 फळांवरील फायटोप्थोरा तपकिरी कूज नियंत्रणासाठी, फोसेटिल एएल २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ४० दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी. 

👉 मळकूज होत असलेल्या बगीच्यात मेफेनोक्झाम एम किंवा फोसेटिल एएल २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाची झाडाच्या आकारमानानुसार प्रति झाड ५-१० लिटर द्रावणाची ४० दिवसांच्या अंतराने दोनवेळा आळवणी व फवारणी करावी. 

👉 कॉलेटोट्रीकम आणि बोट्रीओडिप्लोडिया बुरशी प्रभावित झाडांवर कार्बेन्डाझिम किंवा थायोफनेट मिथाइल १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात १० दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी. 

👉 फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी ८ ते १० मिथाइल युजेनॉल कामगंध सापळे लावावेत. प्रत्येक १५-२० दिवसांच्या अंतराने आमिष (मिथाइल युजेनॉल) बदलावे. 

👉 फळांच्या परिपक्वतेच्या अवस्थेत फळांचा रंग बदलाच्या वेळी फळ रस शोषण करणाऱ्या पतंगाच्या व्यवस्थापनासाठी कडूलिंबाचे तेल १० मि. लि. किंवा पेट्रोलिअम फवारणी तेल (खनिज तेल) २० मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे १०-१५ दिवसांच्या अंतराने, फळांची तोडणी होईपर्यंत फवारणी करावी. बगीच्यात झाडाखाली पडलेली फळे एकत्र करून कंपोस्ट खड्ड्यात पुरून टाकावीत.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post