संत्रा-मोसंबी-लिंबू
मृग बहारातील फळांची गळ कमी करण्याकरिता, १.५ ग्रॅम जिबरेलीक आम्ल अधिक १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) अधिक १ किलो युरीया प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. .पुढील फवारणी १५ दिवसांनंतर करावी.
संत्रा-मोसंबी-लिंबू रोग व किडी नियंत्रण
मृग बहाराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता, १ ग्रॅम जिबरेलिक आम्ल अधिक २ किलो मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०-५२-३४) किंवा पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) यापैकी एक प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून १५-२० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.