वेल वर्गीय पिके
कोरड्या आणि उष्ण हवामानात लाल कोळी या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. या किडीमुळे झाडाची पाने पिवळसर, मलूल व निस्तेज होतात. हिरव्या पानांवर टाचणीच्या टोकाएवढे पिवळसर पांढुरके ठिपके दिसतात. असे असंख्य ठिपके नंतर एकमेकांत मिसळतात. अशी पाने नंतर पिवळसर दिसतात. पिवळ्या पानांचे निरीक्षण केल्यास खालील बाजूस लाल कोळीचे सूक्ष्म जाळे दिसते. अधिक प्रादुर्भावाच्या परिस्थितीत सर्व पाने पिवळी पडून, आकसून गळतात.
नियंत्रणासाठी, अॅझाडिरेक्टिन (१०,००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. किंवा प्रोपारगाईट (५७ ईसी) १ मि.लि. किंवा स्पायरोमेसीफेन (२२.९ एससी) १.२ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.