सोयाबीन
स्वच्छ केलेले बियाणे कोरड्या जागेत स्वच्छ, कीड विरहित किंवा नवीन पोत्यात साठवून ठेवावे. बियाणे भरून ठेवण्यासाठी ज्यूटचे पोते वापरावे. बियाणे वाळविताना सोयाबीनमधील ओलाव्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अधिक ओलावा किंवा आर्द्रता असल्यास बुरशीची वाढ होऊन बियाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो, कीड लागण्याची शक्यता वाढते. साठवणूक करताना बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. साठवणूक करतेवेळी लाकडी फळ्या टाकून त्यावर पोती ठेवावीत, जमिनीची ओल सोयाबीनला लागणार नाही. एकावर एक अशा पोत्यांची थप्पी न लावता दोन पोत्यांवर एक अशा प्रकारे थप्पी लावावी. कोणत्याही स्थितीमध्ये पाचपेक्षा अधिक पोत्याची थप्पी लावू नये. पोत्याच्या चारही बाजूने हवा खेळती राहील, अशा रीतीने पोती ठेवावीत.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.