भात
निमगरव्या आणि गरव्या भात पिकावर लोंबीवरील ढेकण्या किडीच्या प्रादुर्भाव दिसून येत आहे. पीक दुधाळ अवस्थेत असताना प्रौढ ढेकण्या व त्याची लहान पिले दाण्याला छिद्र पाडून आतील रस शोषतात. त्यामुळे दाणे पोचट राहतात आणि लोंब्या अर्धवट भरतात. अशा दाण्यावर एक सूक्ष्म छिद्र दिसून येते. छिद्राभोवती काळपट, तपकिरी ठिपका तयार होतो. प्रति चूड एक ढेकण्या आढळून आल्यास किडीच्या नियंत्रणासाठी, लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.५ मि.लि. किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) ०.९ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.२ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
आपल्या भागातील पावसाचा अंदाज घेऊन हळव्या भात पिकाची कापणी जमिनीलगत ‘वैभव’ विळ्याने करावी. कापणी केल्यानंतर भात शेतात न ठेवता सुरक्षित ठिकाणी न्यावे. मळणी करून उत्पादित भात कोरड्या व सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी पसरून ठेवावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.