कापूस
लाल्या
प्रारंभी पाने टोकाकडून व कडेने पिवळसर पडण्यास सुरवात होते. त्यानंतर पानामधील हरितद्रव्य नष्ट होऊन अँथेासायनिन नावाचे लाल रंगाचे द्रव्य जमा होते. त्यामुळे पाने लाल रंगाची दिसू लागतात. यासच लाल्या असे म्हटले जाते. लाल्या हा कपाशीतील रोग नसून प्रामुख्याने अन्नद्रव्यांची कमरता (त्यातही मुख्यत्वे नायट्रोजन व मॅग्नेशियम) व अन्य काही कारणांमुळे दिसून येणारा परिणाम आहे.
🍁 नियंत्रण
👉 शेतात पाणी साचल्यास त्वरीत चर काढून ते शेताबाहेर काढून द्यावे.
👉 पावसाने बराच काळ उघडीप दिल्यास संरक्षित पाणी द्यावे.
👉 खतांची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी. त्यातही नत्राच्या मात्रा २ ते ३ वेळेस विभागून देणे अतिशय आवश्यक आहे.
👉 पाते लागणे, बोंडे भरणे यांसारख्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेत २ ते ३ वेळेस २ टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी द्यावी.
👉 लाल्याची लक्षणे दिसताच १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मॅग्नेशिअम सल्फेटच्या २ ते ३ फवारण्या द्याव्यात. किंवा ८-१२ किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रति एकर या प्रमाणात जमिनीतून द्यावे.
👉 रसशोषक किडी आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर आढळून आल्यास आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण करावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.