आडसाली ऊस | खताचा दुसरा व तिसरा हप्ता नियोजन |

 आडसाली ऊस

लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांत उसास फुटवे येण्यास सुरवात होते. फुटव्यांची वाढ अधिक जोमदार व्हावी म्हणून नत्रयुक्त खताचा दुसरा हप्ता म्हणजे शिफारशीच्या ४० टक्के नत्राची मात्रा (६४ किलो नत्र = १३९ किलो नीमकोटेड युरिया) द्यावी. नत्राची दुसरी मात्रा देताना कृषिराज औजार चालवून खत जमिनीत चांगले मिसळावे. 

पीक १२ ते १४ आठवड्यांचे झाल्यानंतर उसास कांड्या सुटण्यास मदत होते. त्या वेळी नत्रयुक्त खताचा तिसरा हप्ता म्हणजे शिफारशीच्या १० टक्के नत्राची मात्रा (१६ किलो नत्र = ३५ किलो नीमकोटेड युरिया) देऊन बाळबांधणी करावी. यासाठी निम्मा वरंबा लोखंडी नांगराच्या सहाय्याने फोडून ऊसास हलकी भर द्यावी. भर दिल्यामुळे उसाला नंतर फुटवे फुटण्यास प्रतिबंध होतो. 

को ८६०३२ ही जात रासायनिक खताला जास्त प्रतिसाद देते. त्यामुळे या जातीसाठी २५ टक्के रासायनिक खतांची मात्रा जास्त वापरावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post