सुरु ऊसवरील पांढरी माशी व्यवस्थापन

सुरु ऊस
पांढरी माशी 

जुलैपासून पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव जाणवतो. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये किडीचे प्रमाण अधिक दिसून येते. निचरा नसलेल्या जमिनी, दलदलीच्या क्षेत्रात प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. पिल्ले व प्रौढ पानांच्या मागील बाजूस स्थिरावून अन्नरसाचे शोषण करतात. पाने पिवळसर तांबूस दिसतात. नंतर पाने वाळून जातात. जागोजागी मधले पान वाळलेले दिसून येते. पिल्ले पानावर मधासारखा चिकट पदार्थ सोडतात. त्यावर काळी बुरशी वाढते. प्रकाशसंश्‍लेषण क्रियेमध्ये अडथळा येतो. उसाची वाढ खुंटते, उंचीत घट येते. 

🛡️व्यवस्थापन

👉पाणी साचत असल्यास चर काढून निचरा करावा. पिकाला ताण पडल्यास पाणी द्यावे. 

👉नत्रयुक्त खतांची मात्रा शिफारशीनुसार व योग्यवेळी विभागून द्यावी. 

👉सरूवातीस प्रादुर्भाव कमी असतो, अशावेळी प्रादुर्भावग्रस्त पाने कापून गाडून नष्ट करावीत. 

👉उसाच्या शेंड्याजवळील दुसर्‍या व तीसर्‍या पानावर जास्त अंडी असतात. सुरुवातीच्या प्रादुर्भावाच्या काळात अशी २ ते ३ पाने तोडून अंडी व कोषासहित जमिनीत पुरवीत. 

👉पट्टा किंवा जोडओळ पद्धतीने ऊस लागवड केल्यास पिकात हवा खेळती राहते व फवारणी करणे सोपे जाते. 

👉वहर्टिसिलीअम लेकॅनी १ किलो अधिक १ लिटर दूध प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. 

👉परादुर्भाव दिसून येताच, क्रायसोपर्ला कार्निया या भक्षक मित्रकिडीचे एकरी ४०० प्रौढ अथवा ८०० अंडी प्रसारित करावीत. 

👉निंबोळीवर आधारित किडनाशक १.६ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

👉परादुर्भाव जास्त असल्यास, डायमेथोएट (३० ईसी) २.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारावे.


कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post