सोयाबीन
सतत व अधिक पावसामुळे काही भागात सोयाबीन पिकावर पानावरील/ शेंगावरील बुरशीजन्य ठिपके, करपा व मुळकूज/ खोडकूज या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या रोगांच्या नियंत्रणाकरीता, टेब्युकोनॅझोल (२५.९ ईसी) १.२५ मि.लि. किंवा टेब्युकोनॅझोल (१०%) + सल्फर (६५% डब्ल्यूजी) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रोबीन (२० डब्ल्यूजी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. खोडमाशी, चक्रीभुंगा सोबतच पाने खाणाऱ्या व शेंगा पोखरणार्या अळीचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून थायमिथोक्झाम (१२.६%) + लॅमडा सायहॅलोथ्रिन (९.५% झेडसी) हे संयुक्त कीटकनाशक ०.२५ मि.लि. किंवा क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रामाणात फवारणी करावी.कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.