संत्रा-मोसंबी-लिंबू
कीड नियंत्रण
⭕️फळातील रस शोषणारा पतंग - प्रौढ पतंगांना आकर्षित करण्यासाठी २० मि.लि. मॅलॅथिऑन (५० ईसी) अधिक २०० ग्रॅम गूळ किंवा फळांचा रस प्रति दोन लिटर पाण्यात मिसळून विषारी मिश्रण तयार करावे. हे मिश्रण एखाद्या प्लॅस्टिक ट्रेमध्ये ठेवून, त्यावर प्रकाशाची व्यवस्था करावी. असे प्रकाश सापळे बनवून बगीचामध्ये ठेवावेत. गळालेली फळे गोळा करून मातीत दाबून नष्ट करावी. या शिवाय कडुलिंबाच्या ओल्या पानांमध्ये गोवऱ्या टाकून बगीचामध्ये संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत निरनिराळ्या ठिकाणी धूर करावा.⭕️फळमाशी - नर फळमाशीला आकर्षित करून नष्ट करण्यासाठी सापळा तयार करावा. त्यासाठी ०.५ मि.लि. मिथाईल युजेनॉल अधिक २ मि.लि. मॅलॅथिऑन किंवा २ मि.लि. क्विनालफॉस प्रतिलिटर पाण्यात मिसळून द्रावण बनवावे. हे द्रावण रुंद तोंडाच्या बाटलीत ठेवून, अशा एकरी दहा बाटल्या झाडावर अडकून ठेवाव्यात. दर सात दिवसांनी बाटलीतील द्रावण बदलावे.
⭕️कोळी - या कीडीचा प्रादुर्भाव दिसताच, डायकोफॉल (१८.५ ईसी) २ मि.लि. किंवा प्रोपारगाईट (५७ ईसी) १.५ मि.लि. किंवा इथिऑन (५० ईसी) २ मि.लि. किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी पंधरा दिवसांच्या अंतराने घ्यावी.
⭕️पाने खाणारी अळी – नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० ईसी) १.५ मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन (२५ ईसी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावीकृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.