आंबा झाडावर फांदेमर रोगाच्या उपाय योजना

 आंबा

बुरशीजन्य रोगामुळे झाडावर फांदेमर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रादुर्भित ठिकाणची साल उभी तडकल्यासारखी दिसते. त्यामध्ये पांढरट बुरशीची वाढ झालेली दिसते. फांदी शेंड्याकडून वाळत जाते. नवीन लागवड केलेल्या बागांमध्ये मुख्य खोडावर प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी फांद्या प्रादुर्भित भागाच्या २ ते ३ इंच खाली कापून नष्ट कराव्यात. कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. पावसाची उघडीप असताना १ टक्का बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे खोड व फांद्या व्यवस्थित भिजतील, अशी फवारणी करावी.





कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post