पशु संवर्धन
पावसाळ्यात होणारे प्रमुख आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना
⭕️फऱ्या: जनावराला एकाकी ताप येतो, मागचा पाय लंगडतो. मांसल भागाला सूज येते. सूज दाबल्यास चरचर आवाज येतो.
👉दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.
⭕️घटसर्प: जनावर एकाएकी आजारी पडते. खाणे पिणे बंद होते. अंगात ताप भरतो. गळ्याला सूज येऊन डोळे खोल जातात. घशाची घरघर सुरू होते.
👉दरवर्षी पावसाळ्यापूर्वी निरोगी जनावरांना ऑईल अडज्युव्हट एच.एस. तेलयुक्त लस टोचून घ्यावी.
⭕️कासदाह: सडाला तसेच कासेला सूज येते. दूध अतिपातळ, रक्त-पूमिश्रित येते, जनावर कासेला हात लावू देत नाही.
👉दध काढण्यापूर्वी जंतूनाशकाने कास धुवावी. अधून-मधून कासदाह रोगासाठी दुधाची तपासणी करून घ्यावी. गाई-म्हशी आटविण्याच्या शेवटच्या दिवशी सडात अँटिबायोटिक्स ट्यूब्ज सोडाव्यात.
⭕️थायलेरिओसिस: जनावरांना सतत एक-दोन आठवडे ताप येतो. जनावर खंगत जाते. जनावर खुराक खात नाही. घट्ट हगवण होते.
👉गोचीड निर्मूलन करावे.
⭕️तिवा: जनावराला सडकून ताप येतो. जनावराचे खाणे मंदावते. जनावर थरथर कापते. एका पायाने लंगडते. मान, पाठ, डोळे व पायाचे स्नायू आकुंचन पावतात.
👉डासांचे निर्मूलन करावे.
⭕️पोटफुगी: या आजारात जनावराची डावी कुस फुगते. जनावर बेचैन होते. खाणे व रवंथ करणे बंद करते. सारखी उठबस करते. टिचकीने आवाज केल्यास टमटम आवाज येतो.
👉पावसाळ्यात ओला व कोवळा चारा अतिप्रमाणात देऊ नये.
⭕️हगवण: जनावरास एकसारखे साधे अगर रक्त व शेणमिश्रित पातळ दुर्गंधीयुक्त शौचास होते. जनावर मलूल होते.
👉जनावरांना शुद्ध पाणी व चांगले खाद्य द्यावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.