कापूस
गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन
👉पतंगांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकरी दोन पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर सक्रिय घटक असणारे कामगंध सापळे लावावेत. दर आठवड्याला सापळ्यात अडकलेल्या पतंगांची निरीक्षणे नोंदवावीत. आर्थिक नुकसानपातळी (सलग तीन रात्री ८ पतंग/ सापळा/ रात्र) ओलांडल्यास शिफारशीत कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी.👉परादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात. १०% डोमकळ्या ही आर्थिक नुकसानपातळी समजून फवारणीचे उपाय करावेत.
👉जिथे शक्य असेल तिथे उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी मित्रकिडींचे ६०,०००/ एकर प्रमाणे आठवड्याच्या अंतराने कपाशीच्या फुलोरा अवस्थेपासून तीनदा प्रसारण करावे.
👉हिरवी बोंडे लागल्यानंतर अनिश्चित स्वरूपात एकरी २० बोंडाचे (१ बोंड/ झाड) निरीक्षण करावे. आर्थिक नुकसानपातळी (१०% प्रादुर्भावग्रस्त बोंडे) ओलांडल्यास शिफारशीत कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी.
👉जविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये.
👉कीटकनाशकांचा वापर (फवारणी प्रति लिटर पाणी)
►पात्या लागण्याची अवस्था ५% निंबोळी अर्क ५ मि.लि. अधिक नीम तेल ५ मि.लि. अधिक डिटर्जंट पावडर १ ग्रॅम ►फुलोरा ते बोंडे लागण्याची अवस्था क्विनॉसफॉस (२५ एएफ) २ मि.लि. किंवा थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २.५ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (५० ईसी) २.५ मि.लि.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.