भात
भात पिकामध्ये जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांची टोके तांबडी झालेली दिसून येत आहेत. अशी लक्षणे दिसून आल्यास झिंक सल्फेट २-३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पाणथळ भागातील भात खाचरातील साठलेल्या पाण्याचे तापमान वाढल्यास व दाट लागवड आणि नत्र खताची शिफारशीपेक्षा अधिक मात्रा दिलेली असल्यास तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणामध्ये रोपाच्या चुडात ५ ते १० तुडतुडे आढळल्यास, थायमेथोक्झाम (२५ डब्लूजी) ०.२ ग्रॅम किंवा फिप्रोनिल (५ एससी) २ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.२ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. फवारणी करताना कीटकनाशक चुडाच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी. खाचरात पाणी जास्त काळ न साठता फोडून लावावे. नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.