संत्रा-मोसंबी-लिंबू
संत्रा, मोसंबी फळबागांमध्ये खराब
हवामानामुळे फळगळ दिसून येत आहे. पावसामध्ये तीन-चार दिवसांचा खंड/ उघडीप पडल्यास जिब्रेलिक अॅसिड १.५ ग्रॅम अधिक कॅल्शियम नायट्रेट १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने, २,४-डी किंवा एनएए १.५ ग्रॅम अधिक ०-५२-३४ विद्राव्य खत १. ५ किलो प्रति १०० लिटर पाणी प्रमाणे फवारावे. अंबिया बहरातील संत्रा-मोसंबी फळझाडांना फेरस सल्फेट ५० ग्रॅम, झिंक सल्फेट ५० ग्रॅम आणि शेणखत किंवा गांडूळ खत ५ किलो प्रति झाड यासह शिफारशीत मुख्य अन्नद्रव्यांच्या उर्वरित खतमात्रा आळयात द्याव्यात. ज्या बागेत ग्रिनिंग संक्रमणाची लक्षणे (फळांवर निस्तेज हिरवा पिवळा रंग किंवा हिरव्याकंच फळांवर फळ बटणाच्या उतींचे लालसर होणे) दिसून येत आहेत, अशा झाडांवर टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड ६०० पीपीएम (६० ग्रॅम/ १०० लिटर पाणी) आणि त्यानंतर तीन आठवड्यांनी स्ट्रेप्टोसायक्लीन किंवा के-सायक्लीन १५० पीपीएम (१५ ग्रॅम/ १०० लिटर पाणी) या फवारण्या कराव्यात.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.