केळी पिकातीतअतिपावसात बागेचे व्यवस्थापन.

 केळी

केळी हे पीक २४ ते ४८ तासांपर्यंत बागेत साचलेले पाणी सहन करू शकते. मात्र त्यापुढील काळात मुळांना ऑक्सिजन न मिळाल्यास ती कुजायला लागतात. याचा परिणाम पानांवर होऊन ती पिवळी पडतात. अशा परिस्थितीमध्ये बागेतून पाण्याचा निचरा लवकर करणे आवश्‍यक आहे. पाण्याचा निचरा केल्यानंतर कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडाच्या बुडालगत आळवणी करावी. झाडांची मुळे अन्नद्रव्य शोषून घेण्यासाठी सक्षम होईपर्यंत झाडांवर १९-१९-१९ या विद्राव्य खताची (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post