हळद
पीक संरक्षण
⭕️ सुत्रकृमी
ही मुळावरील कीड अतिशय सूक्ष्म असून, डोळ्यांना दिसत नाही. ती हळदीच्या मुळांवर गाठी तयार करते. जमिनीत पिकांच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषून घेते. पिकांची वाढ खुंटते. प्रथम पिकाचा शेंडा मलूल होवून पिके पिवळी पडून झाड मरते. कालांतराने हळदीच्या कंदामध्ये प्रवेश करते. परिणामी कंद सडू लागतो.
हे पण वाचा | हळद पिकातील खत नियोजन.|
🛡️ उपाययोजना
👉टरायकोडर्मा प्लस (जैविक बुरशीनाशक) २ ते २.५ किलो प्रति एकरी २०० ते २५० किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावी.👉भरणी करतेवेळी एकरी ८ क्विंटल निंबोळी पेंड वापरावी.
👉झडूची सापळा पीक म्हणून लागवड करावी.
👉पढील वर्षी लागवडीपूर्वी प्रादुर्भावग्रस्त जमिनीची खोल नांगरट करावी आणि जमीन किमान ३० दिवसांपर्यंत कडक ऊन्हात तापू द्यावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.