हळद
हळद पिकामध्ये अधिक उत्पादनवाढ व जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी, ठिबक सिंचनद्वारे लागवडीनंतर ५ ते १४ आठवडे (शाखीय वाढ) या अवस्थेमध्ये १० समान हप्त्यांमध्ये ३ किलो नत्र, ०.९ किलो स्फुरद व ०.६ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात आवश्यकता असते. ही खतमात्रा विद्राव्य खतांद्वारे देण्यासाठी १.५ किलो १२-६१-००, ६ किलो युरीया व १.२५ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा प्रति एकर द्यावे.
लागवडीनंतर १५ ते २६ आठवडे (कंद वाढीची सुरुवात) या अवस्थेमध्ये १२ समान हप्त्यांमध्ये १.२५ किलो नत्र, १.२५ किलो स्फुरद व ०.७५ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात आवश्यकता असते. ही खतमात्रा विद्राव्य खतांद्वारे देण्यासाठी २ किलो १२-६१-००, २.२५ किलो युरीया व १.६ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा प्रति एकर द्यावे.