तूर
रोपावस्थेतील रोग नियंत्रण
⭕️पानावरील ठिपके - सुरुवातीच्या अवस्थेत पानांवर व शेंगांवर छोटे गर्द तपकिरी रंगाचे ठिपके आढळून येतात. ठिपक्यावर गर्द तपकिरी रंगाचे चट्टे पडतात. ठिपक्यांचा आकार गोल असून त्यामध्ये अर्धवर्तुळाकार रेषा दिसून येतात. या रोगाची तीव्रता जास्त प्रमाणात असल्यास झाडाची सर्व पाने गळून पिकाचे जास्त प्रमाणात नुकसान होते.
👉नियंत्रण रोग प्रतिकारक जातींची लागवड करावी. कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.