कापूस
आकस्मिक मर
सतत पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण, पाण्याचा निचरा योग्यप्रकारे न होणारी जमीन अशा कारणांमुळे जमिनीत पाणी फार काळ साचून राहते. अशा ठिकाणी काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल पडून आकस्मिक मर (पॅरा विल्ट) रोगाची लक्षणे आढळतात. आकस्मिक मर हा रोग एकतर हळू किंवा जलद गतीने विकसित होऊ शकतो. रोगाचे प्रमाण झाडांची अधिक वाढ किंवा पात्या, फुले आणि बोंडाचे प्रमाण अधिक झाल्यास वाढले��े दिसून येते. प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या हिरव्या पानांवर मर रोगाची लक्षणे दिसतात. ती पाने पिवळसर व तांबूस किंवा लाल होऊन सुकतात. अकाली पानगळ, पाते व बोंडगळ सुद्धा होऊ शकते. पानांच्या वाढलेल्या श्वसनामुळे पाने मलूल पडतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. रोगग्रस्त झाडात जांभळ्या-लाल रंगद्रव्याचा विकास झाल्याचे दिसून येऊ शकते.
कपाशीतील बोंडे सडणे | उपाययोजना |
🛡️ एकात्मिक व्यवस्थापन
👉 शेतात पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अतिशय महत्त्वाचे आहे.
👉 परदीर्घ काळ कमी पाण्याचा ताण पडू देऊ नये. झाडाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास सिंचन करावे.
👉भारी जमिनीत शेणखताचा आणि रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा.
👉 परादुर्भावाची लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी, कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्लूपी) २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्लूपी) २ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.