कपाशीतील बोंडे सडणे | उपाययोजना |

 कापूस
कपाशीतील बोंडे सडणे 

▶️ बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा संसर्ग 

या प्रकारात मुख्यतः काही रोगकारक बुरशी, कुजलेल्या अवशेषांवर जगणारे सूक्ष्मजीव तसेच काही प्रमाणात बोंडावरील जिवाणू करपा कारणीभूत असतो. साधारणतः बोंडे परिपक्व व उमलण्याच्या अवस्थेत असे प्रकार आढळून येतात. बहुतेकदा बोंडावर बुरशींची वाढ झाल्याचे दिसते. 

▶️ आतरिक बोंड सडणे 

ही समस्या प्रामुख्याने संधीसाधू व कमी प्राणवायू अवस्थेत तग धरणारे रोगकारक जिवाणू आणि काही प्रमाणात अंतर्वनस्पतीय रोगकारक बुरशी यांच्या संसर्गामुळे होतो. अशी बोंडे बाहेरून निरोगी दिसतात. मात्र, ती फोडली असता आतील रुई पिवळसर-गुलाबी ते लाल-तपकिरी रंगाची होऊन सडल्याचे दिसते. विकसित अवस्थेतील बियासुद्धा सडल्याचे आढळते. 

⚔️ उपाययोजना 

👉बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. यामुळे त्या ठिकाणी रोगकारक घटकांची वाढ होणार नाही. 

👉पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रसशोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना कराव्यात. 

👉पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, अति आर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घकाळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडणे रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्लूपी) २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन ०.२ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. 

👉बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी, प्रोपीनेब (७० डब्लूपी) ३ ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रोबीन (२० डब्ल्यूजी) १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post