तूर
रोपावस्थेतील कीड नियंत्रण
⭕️खोडमाशी - पीक रोपावस्थेत असताना खोडमाशीची अळी कोवळे खोड पोखरून आत शिरते. खोडाच्या आतील भागावर उपजीविका करते. त्यामुळे रोपांचा शेंड्याकडील भाग वाळून रोपे मरतात.👉नियंत्रण ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
⭕️मावा - पिले व प्रौढ पानाच्या खालच्या बाजूस राहून किंवा कोवळ्या शेंड्यांवर, फुलांवर, देठावर आणि शेंगावर राहून त्यातील अन्नरस शोषून घेतात. पाने पिवळी पडतात व त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. कीड चिकट गोड पदार्थ बाहेर टाकते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो.
👉नियंत्रण ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
⭕️पाने गुंडाळणारी अळी - अळ्या कोवळ्या देठांवर किंवा पानांच्या घड्या करून आत लपून बसतात, त्यावर उदरनिर्वाह करतात. वाढणारे कोवळे शेंडे, पाने एकमेकांना चिकटल्यामुळे मुख्य खोडाची वाढ खुंटते.
👉नियंत्रण ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. किडीचे प्रमाण जास्त असल्यास,, क्विनॉलफॉस (२५ ईसी) १.६ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.