सुरु ऊस
बऱ्याच ठिकाणी नदी, नाले किंवा ओढे यांच्यामुळे पुरामध्ये ऊस बुडतो. अशा ठिकाणी पाणी ओसरून गेल्यानंतर शेतात साचलेले पाणी लहान लहान चरांद्वारे त्वरित निचरा करून घ्यावे. ऊस पडला, लोळला असल्यास तो एकमेकास बांधून उभा करावा. ऊस कांड्यांचा जमिनीशी संपर्क येऊ देऊ नये, अन्यथा त्याला कांडीवर मुळ्या अथवा पांगशा फुटतात. शक्य असल्यास २-३ वेळा हलकी भरणी करून उसाला मातीचा आधार द्यावा. अशा बाधित क्षेत्रात वाफशावरती शिफारशीच्या २५ % नत्र, स्फुरद व पालाशयुक्त खते आणि एकरी ८-१० किलो झिंक सल्फेट शेणखतात मिसळून द्यावीत. उसाची पुन्हा जोमाने वाढ होण्यास मदत होईल. उसाचे वाढे/ शेंडे संपूर्ण पाण्यात राहून ऊस पूर्ण कुजून वाळला असल्यास तो धारदार कोयत्याने जमिनीलगत तोडून घ्यावा. कंम्पोस्ट खत तयार करण्यासाठी वापरावा. शक्य असल्यास अशा ४-६ महिने वयाच्या उभ्या उसाचा खोडवा राखावा. मात्र तोडलेल्या बुंध्यावरती कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.