रब्बी ज्वारी
मुलस्थानी पाणी व्यवस्थापन कोरडवाहू ज्वारीसाठी मुलस्थानी पाणी व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करावा. यासाठी रब्बी हंगामात पेरणी वेळेवर करण्यासाठी जमिनीची मशागत पेरणीपूर्वी करावी. पेरणीपूर्वी एक नांगरणी आणि कुळवाच्या ३ ते ४ पाळया देऊन जमीन तयार करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी प्रति एकरी ४ ते ५ गाड्या शेणखत पसरावे. जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचे पाणी शेतजमिनीत मुरविण्यासाठी जमिनीची बांधणी करावी. त्यासाठी पेरणीपूर्वी ४५ दिवस अगोदर १० x १० चौ.मी. आकाराचे वाफे तयार करावेत. किंवा २.७० मीटर अंतरावर सारा यंत्राच्या सहाय्याने सारे पाडून घ्यावेत. त्यानंतर दर २० मीटर अंतरावर बळीराम नांगराच्या साहाय्याने दंड टाकावेत. यामुळे पावसाचे पाणी भरपूर मुरते. या तंत्राचा वापर केल्यास ज्वारीच्या उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचे निष्कर्ष आहेत.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.