हळद
हळद वाढीची पहिली अवस्था पूर्ण झाल्यानंतर काही जमिनींमध्ये पिकाची पाने पिवळी दिसण्यास सुरवात होते. या वेळी पिकामध्ये कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे ते तपासावे. लोहाची कमतरता असल्यास पानाच्या शिरा हिरव्या राहून मधील भाग पिवळा पडतो, तर नत्राची कमतरता असल्यास शेंड्याकडील एक ते दोन पाने संपूर्ण पिवळी पडतात. लोहाची कमतरता असल्यास ०.१ टक्के (१ ग्रॅम प्रति लिटर पाणी) चिलेटेड लोहची फवारणी करावी किंवा एकरी ५ किलो फेरस सल्फेट सेंद्रिय खतामध्ये मिसळून पिकास द्यावे. नत्राची कमतरता असल्यास जमिनीत नत्राच्या शिफारशीत मात्रा द्याव्यात.