सोयाबीन
सद्यःस्थितीत अनेक ठिकाणी जमिनीत अतिरिक्त ओलाव्याची स्थिती आहे. परिणामी सोयाबीनच्या मुळांना जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण्यात अडथळे येतात. या सोबतच सततच्या ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश अपुरा पडल्याने सोयाबीन पिकाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. परिणामी सोयाबीनची पाने पिवळी पडतात. अशा पानांच्या शिरा मात्र हिरव्या राहतात. अशा परिस्थितीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता लक्षात घेता, विशेषतः नत्र व पालाश यांचा पुरवठा करण्यासाठी १३-०-४५ (पोटॅशिअम नायट्रेट) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.