भात
लोंबीतील ढेकण्या
शेतात या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास विशिष्ट प्रकारचा घाण वास येतो. ढेकण्या निमुळता, आकाराने लहान व लांब पायाचा असतो. पिल्ले हिरवी किंवा तपकिरी असून, प्रौढ ढेकण्या पिवळसर-हिरवा असतो. भाताचे दाणे भरण्याच्या वेळी पिल्ले व प्रौढ ढेकूण त्यातील रस शोषतात. त्यामुळे लोंब्या पोचट राहतात.
भात खाचरातील पाणी व्यवस्थापण.
🛡️ उपाययोजना
👉 बांधावरील तण कापून बांध स्वच्छ ठेवावेत.
👉 पीक दुधाळ अवस्थेत असताना, सर्वेक्षणादरम्यान प्रति चूड एक ढेकण्या आढळून आल्यास, नियंत्रणासाठी लॅमडा साह्यलोथ्रीन (५ ईसी) ०.५ मि.लि. किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) ०.९ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.२ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
👉 अन्यथा क्लोरपायरीफॉस (१.५ डीपी) ८ किलो प्रति एकरी सायंकाळी किंवा सकाळी लवकर वारा शांत असताना पर्यावरण व स्वसुरक्षेची काळजी घेऊन व्यवस्थित धुरळावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.