वेल वर्गीय पिके
फळकूज/ फळसड
हा रोग काकडी, भोपळा, कारली, घोसाळी, पडवळ आणि इतर वेलवर्गीय पिकांवर येतो. पिथिअम, फायटोप्थोरा, फ्युजारिअम , बोट्रायटीस, चिनोफोरा, रायझोक्टोनिया अशा विविध रोगकारक बुरशींच्या प्रादुर्भावामुळे फळसड होते.
फळांचा जमिनीशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी. रोगाची लक्षणे दिसताच, कॉपर ऑक्झिक्लोराईड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा कॅप्टन (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा क्लोरथॅलोनील (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळावर कापसासारख्या पांढर्या बुरशीची वाढ असेल, तर मेटॅलॅक्झील एम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.