जिरायती हरभरा पेरणी

 हरभरा

जिरायती हरभर्‍याची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असताना म्हणजेच सप्टेंबर अखेर अथवा १० ऑक्टोबरपर्यंत करावी. हरभरा पेरणीनंतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस पडणार्‍या पावसाचा जिरायत हरभर्‍याच्या उगवण आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो. जिरायती क्षेत्रात बियाण्याची खोलवर (१० सें.मी.) पेरणी करावी. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभर्‍याची पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरच्या दरम्यान करावी.

   हे पण वाचा    हरभरा पिकासाठी जमिनीची निवड.

 तसेच बागायत क्षेत्रात कमी खोलीवर (५ सें.मी.) हरभरा पेरणी केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन उगवण उशीरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले, घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभर्‍याची पेरणी वेळेवर करणे आवश्यक आहे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. आणि दोन रोपातील अंतर १० सें.मी. राहील अशा पद्धतीने पेरणी करावी, म्हणजे प्रति एकरी अपेक्षित रोपांची संख्या मिळते.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post