हरभरा
जमीन व हवामान हरभरा पिकास मध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. खोल), पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. साधारणत: ५.५ ते ८.६ सामू असणार्या जमिनीत हरभरा पीक चांगले येते. वार्षिक ७०० ते १००० मि.मी. पर्जन्यमान असणार्या भागात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो. अशा जमिनीत जिरायती हरभर्याचे पीक चांगले येते. उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा येतो. परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत हरभऱ्याची पेरणी टाळावी. हरभर्यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते. विशेषत: पीक २० दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणत: १० ते १५ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस असेल तर पिकाची वाढ चांगली होऊन भरपूर फांद्या, फुले आणि घाटे लागतात. असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.