रब्बी ज्वारी पेरणी कालावधी व बियाणे प्रकियाचे महत्त्व

 रब्बी ज्वारी

पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या ओलीवर पाच सें.मी. खोलीपर्यंत करावी. एकरी ५९,२०० रोपे ठेवणे जरुरीचे आहे. त्याकरिता पेरणी ४५ x १५ सें.मी. अंतरावर करावी. बागायतीमध्ये पेरणी ४५ x १२ सें.मी. अंतरावर करावी. पेरणीसाठी दोन चाड्याची पाभर वापरून एकाचवेळी खत आणि बियाणे पेरावे. प्रति एकरी 4 किलोग्रॅम बियाणे लागते. 

रोपावस्थेत खोडमाशी आणि खोडकिडीचा प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास थायमेथोक्झाम (३० एफएस) १० मि.लि. या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. काणी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर ॲसिटोबॅक्टर आणि अॅझोटोबॅक्टर प्रत्येकी २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post