आले पिकातील कंदकुज व कंदमाशी नियंत्रण

 आले

पीक संरक्षण

 ⭕️कदकूज: हा रोग प्रामुख्याने सूत्रकृमी किंवा खुरपणी, आंतरमशागत करताना कंदास इजा झाल्यास त्यातून पिथियम, फ्युजेरियम यासारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये प्रादुर्भाव होऊन कंद कुजण्यास सुरवात होते. प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालपर्यंत वाळत जातात. खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो.
⚔️नियंत्रण
👉२५० ते ३०० किलो सेंद्रिय खतामधून ट्रायकोडर्मा प्लस हे जैविक बुरशीनाशक २.५ ते ३ किलो प्रति एकर प्रमाणे शेतामध्ये मिसळावे. याचा वापर प्रतिबंधात्मक म्हणूनच करावा.
👉कदकूजीस सुरवात झाल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून किंवा एक टक्का बोर्डो मिश्रणाची आळवणी करावी.
👉रोगाची तीव्रता जास्त असल्यास, मेटॅलॅक्झिल (८%) + मॅंकोझेब (६४% डब्ल्यूपी) ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे जमिनीस वाफसा असताना आळवणी करावी. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरील औषधांची आळवणी करावी.

⭕️कदमाशी: कंदमाशी ही आकाराने डासासारखी असून त्यापेक्षा थोडी मोठी असते. तिच्या पंखावर दोन काळे

ठिपके असतात. माशांनी घातलेल्या अंड्यातून अळ्या बाहेर पडून कंद कुरतडतात. त्यानंतर दुय्यम बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो.
⚔️ नियंत्रण
👉कदमाशी शेतामध्ये दिसायला सुरवात झाल्यानंतर क्विनॉलफॉस २ मि.लि. किंवा डायमिथोएट १.५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
👉पावसाची उघडीप न मिळाल्यास एकरी आठ किलो दाणेदार फोरेट झाडाच्या बुंध्याभोवती पसरावे.



कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post