तूर
बरेच दिवस रिमझिम पाऊस पडत राहिल्यास तुरीस खोडकुजव्या या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. विदर्भातील काही भागांत याचा प्रादुर्भाव आढळून येतो. रोगाची लक्षणे फक्त झाडाच्या जमिनीलगतच्या भागावरच आढळून येतात. जमिनीपासून १० ते २० सें.मी. उंचीवरील खोडावर गर्द तपकिरी रंगाचे खोलगट लांब चट्टे दिसतात. सुरुवातीला उथळ आणि कालांतराने ते आत दबले जाऊन खोलवर जातात. फांद्यावरही असे चट्टे दिसतात. अनुकूल वातावरणात चट्ट्यांवर पांढरट गुलाबी रंगाची बुरशी वाढलेली दिसून येते. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन झाडाच्या मुख्य बुंध्यास वेढतात. झाड कमकुवत होऊन त्याठिकाणी लगेच तुटते. या खोडाच्या चट्ट्यांचा उभा छेद घेतल्यास आतील भाग तपकिरी काळा पडल्याचे दिसून येते. झाडांची पाने सुकून वरच्या दिशेने वळतात. पाने जलदगतीने वाळतात आणि झाडांची मर अतिशय वेगाने होते. मागील हंगामातील शेतातील रोगग्रस्त धसकटांपासून रोगप्रसार होतो. मागील हंगामातील धसकटे वेचून त्यांची विल्हेवाट लावावी. शेतामध्ये पाणी साचू राहणार नाही याची काळजी घ्यावी. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.