भात पिकातील खोडकीड, पाने गुंडाळणारी अळी नियंत्रण

 भात
कीड नियंत्रण

खोडकीड

⭕️खोडकीड - अळी कोवळ्या पानावर उपजीविका करते. नंतर खोडात प्रवेश करून आतील भाग पोखरते. रोपांचा गाभा मरतो. कीडग्रस्त झाडांना लोंब्यांत दाणे भरत नाहीत. शेतात ५ टक्के कीडग्रस्त फुटवे किंवा १ चौरस मीटर क्षेत्रात किडीचा १ अंडीपुंज आढळून आल्यास नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
⭕️पाने गुंडाळणारी अळी - अळी पानाची गुंडाळी करून त्यात राहते. आतील पृष्ठभागातील हरितद्रव्य खाते. त्यामुळे बाह्य पृष्ठभागावर पांढरट चट्टे पडतात.

⚔️नियंत्रण (खोडकीड, पाने गुंडाळणारी अळी)
👉कारटॅप हायड्रोक्लोराइड (४ जीआर) १८८ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानीलिप्रोल (०.४ जीआर) १०० ग्रॅम किंवा फिप्रोनील (०.३ जीआर) २०८ ग्रॅम प्रति गुंठा प्रमाणे जमिनीत पुरेसा ओलावा असताना द्यावे.
👉खोडकिडीच्या नियंत्रणासाठी, प्रत्येक २० ते २५ मीटर अंतरावर एक असे एकरी आठ कामगंध सापळे लावावेत.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.





Post a Comment (0)
Previous Post Next Post