हळद पिकातील कंदकूज आणि कंदमाशी व्यस्थापन.

 हळद
पीक संरक्षण 

⭕️कंदकूज: कंदकुजीची सुरुवातीची लक्षणे ही कंदातील कोवळ्या फुटव्यावर लगेच दिसून येतात. नवीन आलेल्या फुटव्याची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढल्यास तो मऊ पडून त्यातून घाण वास येणारे पाणी बाहेर पडत असते. उत्पादनात ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक घट होते.
⚔️ नियंत्रण
👉परतिबंधात्मक उपाय म्हणून ट्रायकोडर्मा प्लस हे जैविक बुरशीनाशक २ ते २.५ किलो प्रति एकरी २५० ते ३०० किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.
👉कदकूजीस सुरवात झाल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे आळवणी करावी.
👉रोगाची तीव्रता जास्त असल्यास, मेटॅलॅक्झिल (८%) + मॅंकोझेब (६४% डब्ल्यूपी) ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे जमिनीस वाफसा असताना आळवणी करावी. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरील औषधांची आळवणी करावी.

⭕️कंदमाशी : ही माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायाची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून, त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात. अळी पिवळसर असून, तिला पाय नसतात. कंदकूज झालेल्या रोगग्रस्त भागामध्ये प्रामुख्याने कंदमाशीच्या अळ्या सापडतात.
⚔️ नियंत्रण
👉परादुर्भाव दिसताच, फोरेट (१० सीजी) एकरी आठ किलो प्रमाणे जमिनीत टाकावे किंवा क्लोरपायरीफॉस (२० ईसी) ३ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे आळवणी करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post