तूर पिक आठवडी सल्ला

 तूर 

पावसाळ्यात खंड पडल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास आणि सिंचनाची सुविधा असल्यास पिकाच्या वाढीच्या अवस्थेत, फुलोऱ्याच्या अवस्थेत आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे अथवा ठिबक सिंचनाने ५० टक्के बाष्पीभवनानंतर पाणी द्यावे. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होते. 

पिकास फुले येण्याच्या अवस्थेत किंवा शेंगा लागण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास, युरिया किंवा पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) किंवा डी.ए.पी. २० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post