वेल वर्गीय पिकातील रोग व्यवस्थापन ( केवडा,भुरी )

वेल वर्गीय पिके
रोग नियंत्रण
केवडा (डाऊनी मिल्ड्यू)

🧐 पिके: काकडी, कलिंगड, खरबूज, कारली, दोडका, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, घोसाळी, पडवळ इ.
रोगकारक बुरशी: सुडोपेरोनोस्पोरा कुबेन्सीस
🧐लक्षणे: सुरवातीला पानाच्या वरच्या बाजूला फिक्कट हिरवे पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात. ढगाळ हवामानात या ठिपक्यांच्या खालच्या बाजूला जांभळट रंगाची बुरशीची वाढ झालेली दिसते. नंतर हेच जांभळट डाग पांढरे-काळे किंवा राखाडी झालेले दिसतात.
⚔️उपाययोजना
👉रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
👉प्रतिबंधात्मक फवारणी- बियाण्याची उगवण झाल्यानंतर २० दिवसांपासून ८ ते १० दिवसांच्या अंतराने, क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी
👉उपचारात्मक फवारणी- रोगाचा प्रादुर्भाव दिसताच,  मेटॅलॅक्झिल + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा अॅझोक्झिस्ट्रॉबीन १ मि.लि. प्रति लिटर पाणी

⭕भुरी (पाऊडरी मिल्ड्यू)
🧐पिके: काकडी, कलिंगड, खरबूज, कारली, दोडका, दुधी भोपळा, तांबडा भोपळा इ.
🧐रोगकारक बुरशी: जवळजवळ सर्वच वेलवर्गीय पिकांमध्ये ईरीसीफी सीकोरेसीआरम; तर कलिंगड, खरबुजामध्ये स्फिरोथीका फुलीजीना
🧐लक्षणे: रोगाची सुरवात प्रथम जुन्या पानापासून होते. पानाच्या दोन्ही पृष्ठभागांवर पिठासारखी पांढरी बुरशी वाढते. प्रादुर्भाव झालेली पाने पिवळी पडून करपतात आणि वेली वाळतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास या बुरशीमुळे पाने भुरकट पडतात. हा रोग देठ, खोड आणि फळांवरही पसरतो. यामुळे वेलींची वाढ खुंटते.
⚔️उपाययोजना
👉भुरी रोगाची लक्षणे दिसताच, (फवारणी प्रति लिटर पाणी) हेक्झाकोनॅझोल १ मि.लि. किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post