केळी मृगबागेचे खत नियोजन.

केळी

मुख्य वाढीच्या अवस्थेतील मृगबागेस ठिबक सिंचन संचातून विद्राव्य खते द्यावीत. त्यासाठी प्रति हजार झाडांसाठी प्रति आठवडा ४.५ किलो युरिया, ६.५ किलो मोनो अमोनिअम फॉस्फेट व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ठिबक संचातून सोडावे. ठिबक सिंचन संच नसल्यास मुख्य वाढीच्या अवस्थेतील मृगबागेस जमिनीतून प्रति झाड ८२ ग्रॅम युरिया, ३७५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश बांगडी पद्धतीने किंवा झाडाच्या दोन्ही बाजूंनी कोली घेवून खत द्यावे. खत दिल्यानंतर लगेच मातीआड करावे. घड पक्वतेच्या अवस्थेतील कांदेबागेस विद्राव्य खते देताना प्रति हजार झाडांसाठी प्रति आठवडा ५.५ किलो युरिया व ७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यातून सोडावे. ठिबक सिंचन संच नसल्यास निसवणीच्या व घड पक्‍वतेच्या अवस्थेतील कांदेबागेस प्रतिझाड ३६ ग्रॅम युरिया अधिक ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश अशी खतमात्रा द्यावी. नवीन केळी बागेस लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यात इडीटीए झिंक आणि इडीटीए फेरस यांची प्रत्येकी ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post